Posts

Showing posts from June 26, 2016

तिमिर धनु

         एकांत क्षणी   मनाच्या पटलावर गतकालीन घटनांचे येणे जाणे चालूच असते. आठवणींचे थवेच्या थवे गर्दी करू लागतात. त्यातीलच काही अगदी अखेरच्या श्वासांपर्यंत न पुसलं जाणार आपलं अस्तित्व वारंवार खुणावत असतात. मग मनाचा वारु सुसाट वार्याच्यागतीने पुढे सरकणार्या वेळेच्या विरूद्ध दिशेने धावू लागतो. उगीचच त्या हव्याश्या वाटणार्या घटना पुन्हा अनुभवण्यासाठी त्या गूढ आठवणींच्या धुसर वाटेवरून भरधाव वेगात नुसताच पळत राहतो. सारे लगाम त्या वाटेवरील धुळीत तूटुन पडतात.          अशातच त्यांतल्याच काही अश्या ज्यांच अस्तित्व जाजतं. ‘ ते पुसता आल असत तर किती बरं झालं असतं ’ अशी भावना उफाळून येते. त्यांचे रंग इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे सोज्वळ नसतात. अगदी प्रखर असतात. डोळ्यांत तीव्रतेने घुसणारे भडक रंग.....काळी छाटा असणारे....अशा धनुला काय म्हणावे बरे.... ‘ तिमिरधनु ’… गेले काही दिवस अंधारलेल्या मनाच्या नभावर थबकले आहे.            त्यातल्या रंगांची शहानिशा करायला लागताच मन नानाप्रकारचे प्रश्न विचारायला सुरूवात करते. ‘ का वागली मी अशी त्यावेळी ?’   मग मन स्वताचीच समजूत घालण्यास सज्ज होते. परिस्थित