Posts

Showing posts from June 12, 2016

पर्जन्य(मान कमाल आणि किमान)

Image
पर्जन्य म्हणण्यापेक्षा पाऊस...एवढा परका वाटू लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. वयाच्या प्रत्येक टप्यावर त्याचं असणं किती निराळं भासत आलय आजवर.....             बालपणीच्या कोवळ्या वयात तो एका अल्लड सवंगड्यासारखा भेटायचा. ज्याच्या सोबत तासन् तास खेळावे असा. तो आला की आम्हा दोघांची हुंदडायची तयारी व्हायची. मनसोक्त भिजल्यावर कोरडी होऊन जेव्हा मी चादरीत घुसायचे तेव्हा ही दारावर धो धो आपटून मला हाका द्यायचा. अगदी रात्रभर..... शाळेतला पाऊस म्हणजे नव्या दप्तराची , नव्या वह्या-पुस्तकांची , नव्या छत्रीची …. एका नव्या शालेय वर्षाची चाहूल घेऊन येणारा पाऊस. शाळेला दांडी मारून किंवा कधी अनायासे सुट्टी मिळून दिवसभर छान कागदाच्या होड्या बनवयचो आम्ही. आजही पाऊस आला की शालेय जीवनातले अनेक प्रसंग तरंगत राहतात मनात कित्येकदा... त्यानंतरचा पाऊस गुलाबी...एखाद्या ‍प्रियकरासारखा...चिडवणारा …. सतावणारा ….. रात्रीच्या एकांत क्षणी सगळे झोपलेले असताना अचानक येऊन भेटणारा .  त्याच्या आगमनाची आस लाऊन बसलेली मी , त्याच्या येण्याने मोहरुन जायचे. मग चहाच्या कपांतून निघणार्‍या वाफांत बर्याच भेटी व्हायच्या आमच्