मधुमनाने चाखलेले गोड,कडू,तिखट,खारट,तूरट आणि रसाळ अनुभव.....जसेच्या तसे.....अगदी भेसळ मुक्त!!!
वादळांत
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
मोडकळीस आलेले मन आणि हा तुफान वारा उन्हं रखरखीत फार नाही राहिला निवारा गेल्या पावसाळ्यातच झिरपत होत्या भिंती सारवले सारे घर मनवन्या केल्या किती उभे राहिले खंबीर एका नव्या आवेगाने पण क्षणातच सारे स्तब्ध केले वादळाने!!!
क्षितिजे विस्तारत गेली कक्षाही रूंदावल्या आम्रतरूचा बहर आला रोपाला इवल्या सरसर हे दिवस गेले वार्यावर होऊन स्वार मूशीतून सोने उपजले मुकाट खाऊन मार कधी मधी बघतात मागे वळून नजरा साठवूनी ठेवती मनी गतकालीन घटना पुन्हा नव्या उमेदीने पंखात येऊन बळ मार्गात उडावया क्षितिजे आणखी फार!!!
तुला सांगितले का कोणी आल्या होत्या त्या दाराशी थेट शिरल्या मनात आणि डोळ्यांत बसल्या किस्से पुराने सांगुनी पोटभरुनी हासल्या घेऊन त्या आल्या संगे ती उन्हं नी पावसाळे जेव्हा उनाड होते वय आणि मन हे बेभान खूप बोलल्या माझ्याशी मज रडवूनी गेल्या तुझ्या स्पर्शाची तहान मनी जागवूनी गेल्या!!!
एकांत क्षणी मनाच्या पटलावर गतकालीन घटनांचे येणे जाणे चालूच असते. आठवणींचे थवेच्या थवे गर्दी करू लागतात. त्यातीलच काही अगदी अखेरच्या श्वासांपर्यंत न पुसलं जाणार आपलं अस्तित्व वारंवार खुणावत असतात. मग मनाचा वारु सुसाट वार्याच्यागतीने पुढे सरकणार्या वेळेच्या विरूद्ध दिशेने धावू लागतो. उगीचच त्या हव्याश्या वाटणार्या घटना पुन्हा अनुभवण्यासाठी त्या गूढ आठवणींच्या धुसर वाटेवरून भरधाव वेगात नुसताच पळत राहतो. सारे लगाम त्या वाटेवरील धुळीत तूटुन पडतात. अशातच त्यांतल्याच काही अश्या ज्यांच अस्तित्व जाजतं. ‘ ते पुसता आल असत तर किती बरं झालं असतं ’ अशी भावना उफाळून येते. त्यांचे रंग इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे सोज्वळ नसतात. अगदी प्रखर असतात. डोळ्यांत तीव्रतेने घुसणारे भडक रंग.....काळी छाटा असणारे....अशा धनुला काय म्हणावे बरे.... ‘ तिमिरधनु ’… गेले काही दिवस अंधारलेल्या मनाच्या नभावर थबकले आहे. त्यातल्या रंगांची शहानिशा करायला लागताच मन नानाप्रकारचे प्रश्न विचारायला सुरूवात करते...
Comments
Post a Comment