Tuesday, 9 August 2016

स्मृती


तुला सांगितले का कोणी
आल्या होत्या त्या दाराशी
थेट शिरल्या मनात
आणि डोळ्यांत बसल्या
किस्से पुराने सांगुनी
पोटभरुनी हासल्या
घेऊन त्या आल्या संगे
ती उन्हं नी पावसाळे
जेव्हा उनाड होते वय
आणि मन हे बेभान
खूप बोलल्या माझ्याशी
मज रडवूनी गेल्या
तुझ्या स्पर्शाची तहान
मनी जागवूनी गेल्या!!!5 comments: